प्रतिनिधी: दोडामार्ग / सुमित दळवी
दोडामार्ग शहरात उभी करून ठेवण्यात आलेल्या दुचाकीला शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा प्रकार आज सकाळी दोडामार्ग शहरात घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की संबंधित दुचाकी ही त्या परिसरातील एका युवकाने त्याठिकाणी उभी करून ठेवली होती. त्या दरम्यान अचानक गाडीने पेट घेतला.आग विझवण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र आग आटोक्यात न आल्याने दुचाकी पूर्णता जळून खाक झाली.


