मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव कुटुंबियांसमवेत दुबईत सुट्टी मानवत आहे. सिद्धार्थ आपल्या दोन्ही मुलींना खांद्यावर घेऊन दुबईच्या रस्त्यांवर होता.सिद्धार्थने सोशल मीडियावर नुकताच व्हिडिओ शेअर केला आहे.तसंच या व्हिडिओमध्ये तो दुबईच्या मॉलमध्ये सुद्धा आपल्या लेकीला खांद्यावर बसवून धम्माल करताना दिसत आहे. या आधी त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो आपल्या छोट्या मुलीसोबत पाळण्यामध्ये बसून दुबईचे सौंदर्य पाहत मज्जा करताना दिसला होता. सिद्धार्थने हा व्हिडिओ शेअर करत ‘बाप म्हणजेच मित्र’.असे खूपच सुंदर कॅप्शन दिले आहे.


