मुंबई: सदाबहार अभिनेत्री रेखा हीरामंडी चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार असल्याची माहिती हाती आली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटात रेखाने काम करावे अशी त्यांची इच्छा आहे.या चित्रपटात रेखाला खास भूमिका देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, रेखाला मात्र, अद्याप रेखाकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.संजय लीला भन्साली यांनी हीरामंडीसाठी नेटफिल्क्ससोबत करार केला असल्याचीही माहिती आली आहे.हीरामंडी’हा चित्रपट माझ्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. पाकिस्तानातील लाहोरच्या दरबारींवर आधारित महाकाव्य आहे.
हीरामंडीचे कथानक महत्त्वाकांक्षी असून ते एक भव्य आणि सर्वसमावेशक मालिका आहे. त्यामुळे यावर चित्रपट करण्यापूर्वी मनात थोडी भीती देखील आहे, पण मी यासाठी खूप उत्साही आहे. मी Netflix सोबतची भागीदारी केली असून हरामंडीला जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास उत्सुक आहे असे ते म्हणाले आहेत.


