सिंधुदुर्ग: भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

0
159

ओरोस: भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2021-22 करिता शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30.जून 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. शासनाने दि. 14.12.2021 पासुन https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अदयापही अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत. त्या विदयार्थ्यांसाठी शासन स्तरावरुन सन 2021-22 मधील शिष्यवत्तीचे अर्ज भरण्यासाठी 30.जून 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

जिल्हयातील सर्व महाविदयालय व विद्यार्थ्यांना अवाहन करण्यात येते की, ज्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अदयापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत, त्या विदयार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 30 जनू 2022 पर्यंत https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी. सन 2020-21 वर्षामधील रिअप्लाय अर्ज करण्यासाठी 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली असल्याने तात्काळ शिष्यवृत्तीच्या अर्जांचे नुतनीकरण करावेत.

सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व महाविदयालयांनी महाविदयालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतुन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे वर्ग करण्याची दक्षता घेण्यात यावी असे अवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नुतनीकरण करणेबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय (दूरध्वनी क्र.02362-228882) येथे संपर्क साधावा. असे आवाहन ही समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त घाटे यांनी केलेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here