सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद विलवडे शाळा नं.2 (टेंबवाडी) प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा

0
107

प्रतिनिधी: संजय भाईप (सावंतवाडी)
जिल्हा परिषद विलवडे शाळा नं. २ (टेंबवाडी) प्रशालेत ‘शाळा प्रवेशोत्सव सोहळा’ मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. इयत्ता पहीलीत प्रवेश करण्यार्या विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प व गोड मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. शाळा पूर्व तयारी’ मेळावा निमित्त विलवडे गावचे सुपुत्र व मुंबई येथील एस.आर.दळवी फाउंडेशन चे व्यवस्थापकीय विश्वस्त रामचंद्र उर्फ आबा दळवी व सिता दळवी यांनी शाळेला साउंड सिस्टिम भेट देण्याचे जाहीर केले होते. बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी सरपंच रावजी दळवी यांच्याहस्ते शाळेला साउंड सिस्टिम सुफुर्त केले. शाळा व्यवस्थापन समिती,पालक,मुख्याध्यापक यांनी दळवी यांचे आभार मानले.

माजी उपसभापती कृष्णा सावंत व मान्यवरांच्या उपस्थीतित सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच प्रकाश दळवी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत, उपाध्यक्षा प्राजक्ता दळवी,पूर्वा दळवी,सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी,साक्षी दळवी, सामजिक कार्यकर्ते सुभाष कानसे, धनश्री सावंत,संजय सावंत,महेंद्र सावंत,सर्व पालक समिती सदस्य,आजी माजी विद्यार्थी,अंगणवाडी सेविका,मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.शाळेतचे छप्पर मोडकळीस आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेऊन तात्पुरत्या स्वरुपात प्लास्टीक वापर करुन दुरुस्त करुन घेतले आहे. दात्यांनी मदत करण्य‍ाचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश काळे यांनी केले तर आभार सचिन शेळके यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here