“माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे .मालिकेमध्ये सध्या नेहा आणि यशाच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.परंतु या त्यांच्या आनंदाला गालबोट लावण्यासाठी अविनाशची म्हणजेच नेहाचा पहिल्या पती मालिकेत प्रवेश करणार आहे. ही अविनाशच्या भूमिका अभिनेता निखिल राजेशिर्के साकारतोय.
अविनाशला बघून नेहाची काय प्रतिक्रिया असणार आहे आणि अविनाशचा नेहा आणि परीच्या आयुष्यात परत येण्याचा हेतू नक्की काय आहे हे बघताना प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार आहे. परी आणि नेहाच्या सुखी आयुष्यात अविनाश नावाचं वादळ येणार आहे तेव्हा त्यांची आयुष्य बदलणार की यश या वादळातून सगळ्यांना सुखरूप बाहेर काढणार हे पाहणं रंजक ठरेल.
अविनाशची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल राजेशिर्के हा ख-या आयुष्यात डॉक्टर असून त्याने मुंबईतून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो अभिनयाच्या आवडीने अभिनय क्षेत्राकडे वळला.आतापर्यंत निखिलने ‘अजूनही बरसात आहे’ आभाळमाया’ ‘दिल्या घरी तू सुखी रहा’या मालिकेत काम केल आहे. तसेच निखिलने ‘तेंडुलकर आउट’ या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.


