ओरोस: जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज येथील क्रीडा संकुलामधील शासकीय जलतरण तलावाची सविस्तर पाहणी केली. तलावाच्या दुरुस्तीसाठी प्राधिकरणामधून निधी देणार असल्याचे सांगून त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ अंदाजपत्रक सादर करण्याची सूचना उपअभियंता मनोज जोशी यांना दिली.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जलतरण तलावासह महिला आणि पुरुषांसाठी चेंजिंग रुम, स्वच्छता गृह यांची पाहणी केली. दरवाजे, शॉवर बसवण्याबरोबरच तलावाच्या भोवती फरशा बसवणे, पाण्याची स्वच्छता ठेवणे, रंगरंगोटी आदी कामांबाबत त्यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.


