आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.भाजपने बंगाल निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सर्वांचे लक्ष्य पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर होते. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे.तृणमूल काँग्रेस 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला 100 चा आकडाही पार करता आलेला नाही.
पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूतील भाजपच्या पराभवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला कोरोना संकट हाताळण्यात आलेल्या अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले आहे


