अफगाणिस्तानात 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाने ९०० जणांचा बळी घेतला आहे. शक्तिशाली भूकंपाचा केंद्रबिंदू खोस्ट शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर होता. तर त्याची खोली 51 किलोमीटर अंतरावर होती.
बीबीसीने एका स्थानिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शक्तिशाली भूकंपाचा सर्वाधिक फटका पक्तिका प्रांताला बसला आहे. पक्तिका प्रांतात सर्वत्र विध्वंस झाला आहे. तालिबान सरकारमधील आपत्ती व्यवस्थापन विभागातील प्रमुख नसीम हक्कानी यांनी सांगितले, की आतापर्यंत भूकंपाने 900 जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांची आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.
बुधवारी पहाटे झालेल्या या भूकंपाचे धक्के पाकिस्तानात देखील जाणवले.या विनाशकारी भूकंपामुळे शेजारी असलेला पाकिस्तान देखील हादरला आहे पाकिस्तानात कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा भागात देखील 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. इस्लामाबाद, मुल्तान, भाकर, फालिया, पेशावर, मलाकंद, स्वात, मियांवली, पाकपट्टन आणि बुनेरसह अनेक शहरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे.. .


