प्रतिनिधी – सुरेश कोलगेकर
वेंगुर्ला प्रतिनिधी- कोकणातील मुख्य पीक असलेले भात शेतीचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान या बरोबरच प्रथमच आंबा, काजू व नारळ या पिकांवर होणा-या किटकांच्या प्रादुर्भावातून पिके कशी वाचवावीत याचे डेमोद्वारे प्रात्यक्षित दाखवून या फळपिकांचे नुकसान कसे टाळावे याचे मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण कृषी जागृकता विकास योजना कार्यानुभव प्रकल्प अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्ष कृषी पदवी मध्ये शिकणा-या कृषिकन्या तनया सावंत, ईश्वरी भोगटे, तन्वी देसाई, पूजा गवंडळकर, तन्वी राणे, धनश्री ढवण, रुदाली मासये यांचे लोरे गावचे येथील सरपंच अजय रावराणे यांचेसह शेतकरी व ग्रामस्थांनी स्वागत केले.
यावेळी शेतीतील नवीन तंत्रज्ञान पीक पद्धती कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कशी फायदेशीर असते. आपल्या कोकणातील मुख्य पीक असलेले भात शेतीचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाने तसेच या भागांत दरवर्षी आंबा, काजू व नारळ या महत्वपूर्ण उत्पन्न देणा-या फळबागायतीवर होणा-या तुडतुडे, भुरी, करपा, कोळी या रोगांविषयी व ते नष्ट करण्यासाठीच्या उपाय योजनांची माहिती तज्ञांमार्फत देऊन शेतक-यांचे उत्पन्न वाढू शकते. यावर आधारीत प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावा, तज्ञांचे कृषी विषयक मार्गदर्शन, डेमो इत्यादीचे शेतक-यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन या प्रकल्पामधून होत आहे. तसेच कृषिकन्यांनी गावातील शेतक-यांच्या शेतीतील समस्या पशुपालन व्यवसाय सेंद्रिय व रासायनिक बीजप्रक्रिया व माती परीक्षण याबद्दल जागरुकता ग्रामस्थांना करून दिली.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. मोहिते, डॉ. योगेश जंगले आणि इतर प्राध्यापक कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.


