वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कोलगेकर
वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयात २३ जून रोजी पार पडलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या मासिक बैठकीत निराधार योजनेची एकूण ४२ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
वेंगुर्ला तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची मासिक बैठक समितीचे अध्यक्ष यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार यांचे दालनांत संपन्न झाली. यावेळी तुकाराम परब, विश्वनाथ चव्हाण, राजेंद्र कांबळी, मकरंद परब, सुरेश भोसले, चित्रा कनयाळकर, वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे प्रतिनीधी संदिप मांजरेकर, संजय गांधी योजना समिती सचिव तथा तहसिलदार प्रविण लोकरे, महसुल नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे, संजय गांधी निराधार योजना विभागाचे अव्वल कारकून निलेश मयेकर आदी उपस्थित होते.
या सभेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेची २६, श्रावणबाळ सेवा राज्य योजनेची ९ व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेची ७ प्रकरणे मंजूर करण्यात आली.


