मुंबई- शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या मागोमाग रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा देखील शिंदे सेनेत सामील होण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी ते गुजरातमधील सुरत येथून खाजगी विमानाद्वारे सुरतला गेले आहेत. शिवसेनेत येण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2014साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरेंचे गुणगान गाणारे उदय सामंत आज मात्र सुरतला पोहोचले आहेत..कालपर्यंत ते शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांना परत मातोश्रीकडे येण्यासाठी साद घालत होते. मात्र शेवटच्या काही क्षणात असे काय घडले, की ज्यामुळे मंत्री सामंत हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले आहेत.


