मुंबई- सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी अस्थिर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यापासून दोन गटात आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. त्यामुळे राज्यात कधीही नवीन सरकार येईल अशी स्थिती आहे. पण महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला असून चांगले निर्णय घेतले जात आहेत.
आदित्य ठाकरे यांनी वरळीतील बीडीडी चाळीतील पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 25 लाखांत घर देणार असल्याचे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुनर्विकास प्रकल्पात बांधकाम खर्चात पोलिस कर्मचाऱ्यांना घर देण्याचा निर्णय देण्यात आला आहे. पूर्वी त्या घरांच्या किंमत 50 लाख ठरविण्यात आली होती. पण पोलिस बांधवांनी विनंती केल्यानंतर त्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. 25 लाखांत घर देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे.


