रत्नागिरी- रत्नागिरीच्या पिनांशू विजय पोकळे याची अमेरीकेत ‘मास्टर्स’ करीता निवड

0
14

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी- रत्नागिरीतील पिनांशू विजय पोकळे याची अमेरिका येथील मेरीलॅन्ड युनिव्हर्सिटी बाल्टिमोर येथे ‘एम एस’ ( मास्टर्स ) करीता २ वर्षासाठी निवड झाली आहे
पिनांशू हा रत्नागिरीतील कॉन्व्हेट हायस्कुल उद्यमनगर येथे १० वी ९२ % व १२ वी ला गोगटे कॉलेज ७५ % गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर नंतर एमजीएम कॉलेज पनवेल मुंबई येथे तो बीईबायोटेक ४ वर्षाची पदवी ७,७५ पॉइंट्सने ( डिस्टिकशनने ) ऊत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याला अमेरिका येथे शिक्षणासाठी प्रवेश घेणेसाठी ‘एलटीएस’ची परीक्षा १० पैकी ८ गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्यानंतर अमेरिका येथील मेरीलॅन्ड युनिव्हर्सिटी बाल्टिमोर येथे ‘एमएस’ ( मास्टर्स ) करीता २ वर्षासाठी त्याची निवड झाली आहे .


पिनांशूचे वडील विजय पोकळे हे कृषी अधिकारी वर्ग २ चे अधिकारी असून सध्या त्यांच्याकडे जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी व गट विकास अधिकारी ( गट ब ) प , स , रत्नागिरी चार्ज आहेत व आई सुश्मिता पोकळे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहेत . त्यांना कोविड १९ काळात उत्कृष्ट काम केल्यामुळे जिल्हास्तरीय पुरस्कार व इतर विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here