कुडाळ- जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 27.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 21.8 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 691.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.
देवगड-23.1(676.5),मालवण-18.2(720.7), सावंतवाडी-24.5(769.5),वेंगुर्ला-25.7(657.2),कणकवली-16.4(629.0),कुडाळ-27.2(736.9), वैभववाडी-24.2(641.3),दोडामार्ग-12.9(648.8) असा पाऊस झाला आहे.


