ओरोस- जिल्हा पोलीस अभिलेखावर बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. कुडाळ येथे २, बांदा येथे 1 अशा एकुण 3 दुचाकी बेवारस वाहनांचे समावेश आहे. या वाहनांच्या मालकांचा सर्वतोपरी शोध घेण्यात आलेला आहे. परंतू आज पर्यंत या वाहनांचे मालकांबाबत कोणतीही उपयुक्त माहिती प्राप्त झालेली नाही. तसेच भविष्यात सुध्दा या वाहनांचे मालक मिळून येतील अशी शक्यता नाही. ही वाहने स्क्रॅप करुन त्या भंगार साहीत्याचा लिलाव सोमवार दि.11 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे आवारात आयोजित करण्यात आलेला आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी 3 बेवारस दुचाकी वाहनांचे मुल्यांकन केलेले असून त्याची रक्कम रुपये 14,200 अशी निर्धारित केलेली आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या इच्छुकांनी त्यांचेकडे असणारा भंगार माल खरेदी –विक्री करण्याच्या परवान्याची प्रत आणि तात्पुरत्या स्वरुपातील अनामत रक्कम रुपये 5000 दि. 10 जुलै 2022 रोजी सायंकाळी 16. वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग येथे जमा करावी.
भंगार माल खरेदी – विक्री करण्याचा अधिकृत परवाना असणाऱ्या आणि मुदतीमध्ये अनामत रक्कम भरण्यालाच लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविता येईल. अशी माहिती,स्थागुशा पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी दिली.


