प्रतिनिधी-संजय भाईप(सावंतवाडी)
बांदा – दाणोली -आंबोली रस्त्यावर वाफोली डोंगरीकर हाँटेल समोर तिलारी पाटबंधारे पोटकालव्याच्या पाईप लाईनसाठी खोदण्यात आलेल्या चरातील माती वाहून गेल्याने याठिकाणी जीवघेणे भलेमोठे खड्डे पडले आहेत. मार्गावर आडावा चर खोदल्याने भरावासाठी टाकलेली माती वाहून गेल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी चालकांना अपघात होऊन बरेच जण जखमी झाले आहे. तसेच अतीवृष्ठी सुरु असल्याने साचून मार्गावर चिखलाचे सामाज्र पसरलेले आहे. वाहन चालकास पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यात खड्डा हे पणं कळत नाही. यामुळे मोठ्या अपघातची शक्यता नाकारता येत नाही. अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल स्थानिकांतून विचारत आहे.
पावसापुर्वी रस्त्यांवर खोदाई करण्यात आल्यानंतर भरावा टाकून सिमे्ट क्रीक्रीटीकरण करणे गरजेचे होते. पण्ं तिलारी पाटबंधारे पोटकालव्याच्या पाईप लाईनसाठी खोदाईनंतर फक्त माती टाकून फळ काढला.त्यानंतर रस्त्याची दुरवस्था काय झाली. हे पहायाला वेळ नाही असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
सद्या गोव्यातून आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा जाण्यासाठी हा जवळाचा मार्ग आहे.हजारो पर्यटक या रस्त्यावरुन आनंद लुटण्यासाठी ये-जा करत आहे. तसेच मुंबई,पुणे,सांगली, सातारा येथून गोवात जाण्यासाठी याच मार्गाने प्रवास करतात. याठीकाणी दहाहून अधिक अपघात झाले असून वाहनाचे मोठे नुकसान होत आहे.येथे मोठी दुर्घटना उद्भवल्याचा सर्वस्वी संबधित विभाग जबादार राहील अशी कडक भुमिका स्थानिकांनी केला आहे.
रस्त्याच्यावर भलेमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत.हे खड्डे अपघाताना निमंत्रण देणारे ठरत असून यावर रस्त्याचे महत्व समजुन संबधीत विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.


