सिंधुदुर्ग- व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कुल मध्ये आरोग्य विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
21

प्रतिनिधी – संजय भाईप (सावंतवाडी)
बांदा – व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कुल मधील एम.एस.एफ.सी विभागाच्या विद्यार्थ्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँ.आरती देसाई यांनी मार्गदर्शन केले.एम. एस.एफ.सी विषयाअंतर्गत गुह आरोग्य विभागामधील आरोग्य विषयक प्रात्यक्षिक शिकवले जातात.

या विभागातील विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सखोल ज्ञान मिळावे या उद्देशाने आज प्रशाळेत डाँ.आरती देसाई यांनी येत आरोग्य विषयक माहीती दिली.यामध्ये रक्तदाब, रक्तगट,हीमोग्लोबिन, न्युमोनिया, आरोग्य विषयक काळजी याची माहीती देण्यात आली. यावेळी सूरूवातीस प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी डाँ.आरती देसाई यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई,समन्वयक श्री.राकेश परब,निदेशक श्री.भिकाजी गिरप, निदेशिका सौ.रिया देसाई, सौ.गायत्री देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सौ.गायत्री देसाई यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here