एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ,शपथ विधी संपन्न
▪️ एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
▪️ देवेन्द्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री
नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यावर प्रथेप्रमाणे दोघांनीही मंत्रालयात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील पाऊस-पाणी, रखडलेले प्रकल्प आदींचा आढावा घेण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांला मुख्यमंत्रीपद देऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखविला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले


