अग्निवीरांच्या भरतीसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरु

0
17

मुबंई- भारतीय लष्करामध्ये आजपासून अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात

महत्त्वपूर्ण तारखा लक्षात घ्या

अधिसूचना जारी झालेली तारीख – 20 जून 2022
ऑनलाइन नोंदणी- 1 जुलै 2022
लेखी परीक्षा – 16 ऑक्टोबर
प्रशिक्षण – 30 डिसेंबर 2022 नंतर
अग्निपथ योजनेंतर्गत, उमेदवारांना 4 वर्षांसाठी भरती केली जाईल. यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/म्युनिशन एक्झामिनर), अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर, टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन जनरल (8 वी पास) आणि अग्निवीर ट्रेड्समन टेक्निकल या पदांचा समावेश आहे.
ज्या उमेदवारांनी या पदांसाठी यशस्वीरित्या अर्ज केला आहे त्यांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) आणि शारीरिक मापन चाचणी (PMT) मध्ये उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी आणि त्यानंतर लेखी चाचणीसाठी बोलावले जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 17½ ते 23 वर्षे दरम्यान असावे.

पगार किती असेल ?

प्रथम वर्ष- 30,000 रुपये (तसेच लागू भत्ते)
द्वितीय वर्ष- 33,000 रुपये (तसेच लागू भत्ते)
तीसरे वर्ष- 36,500 रुपये (तसेच लागू भत्ते)
चौथे वर्ष- 40,000 रुपये (तसेच लागू भत्ते)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here