सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील रास्तभाव दुकानांना परवाना मंजूरी देण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
20

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने व मंजुरी देण्यात येणार आहे. या बाबतचा एकत्रित जाहिरनामा दि. 1 जुलै 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ केरोसीन परवाना मंजूरी सावंतवाडी, दोडा मार्ग, कुडाळ,मालवण या तालुक्यांना देण्यात येणार आहे .जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील केवळ रास्तभाव दुकाने परवाना मंजूर करवयाचे तालुके, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी, हे असून या क्षेत्रातील पंचायत बचत गट, सहकारी संस्था यांनी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या दिलेल्या कागदपत्रांसह दि. 31 जुलै 2022 पर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयात दाखल करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

सदराचा जाहिरनामा संबंधित गावातील तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका कार्यालय व विविध कार्यकारी सोसायटी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.तसेच यासंबंधीची गांव दवंडी देऊन गावातील लोकांपर्यंत याबाबतची माहिती देण्यात येत आहे.

सदर जाहिरनामा तहसिलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरही प्रसिध्द करण्यात येणार आहे. अर्जाचे कोरे नमुने विहित फी घेऊन उपलब्ध करुन द्यावेत. विहीत मुदतीत भरुन प्राप्त होणारे अर्ज त्यावर दाखल तारीख घालून स्वीकारण्यात यावेत व प्राप्त सर्व अर्जाची छाननी जागेची तपासणी व इतर आवश्यक चौकशी करुन त्याबाबत छाननी पत्रक तयार करुन प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्रायासह दि. 31 ऑगस्ट 2022 पूर्वी या जिल्हा पुरवठा कार्यालत सादर करावा. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here