सिंधुदुर्ग: दोन लाख रुपयांची लाच घेताना महिला पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

0
163

प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर
ओरोस: ओरोस येथील पाेलिस अधीक्षक भवनातील महिला अत्याचार निवारण कक्षात कार्यरत असणार्‍या नलिनी शंकर शिंदे या सहाय्यक पोलीस निरिक्षकाला पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत विभागाने ही धाड घातली त्यात ती महिला पोलिस अधिकारी रंगेहाथ पकडली गेल्यामुळे जिल्हा पोलिस दल हादरून गेले आहे
पुणे निगडी येथील वृध्द महिला डॉक्टरचा गर्भलिंगनिदान हॉस्पिटलला सील लावणे व कारवाई करण्याच्या कामात सहकार्य करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलिस दलात महिला अत्याचार निवारण कक्षात कार्यरत असणार्‍या सहायक पोलिस निरीक्षक नलिनी शिंदे याने सदर महिला डॉक्टरकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली होती त्यावर दोन लाख रुपयांची तडजोड होऊन ही रक्कम गुरुवारी सायंकाळी स्वीकारताना तिला पुणे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here