प्रतिनिधी-अभिमन्यू वेंगुर्लेकर
मुंबई- राज्यात मोठ्या सत्ता संघर्षानंतर शिंदे सरकार सत्तेत आलं आहे. अश्यात आता बंडखोरी करून शिंदेची सोबत केलेल्या नेत्यांना आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा आहे.
कोकणात चुरस पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्गातून नितेश राणे आणि बंडखोर गटातील दिपक केसरकर यांच्यात स्पर्धा आहे. तर रत्नागिरीत उदय सामंत आणि योगेश कदम या दोघांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. तर रायगडमधून भरत गोगावलेंना मंत्रीपद निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. शिवाय प्रशांत ठाकूर यांचं नावही चर्चेत आहे
.कोकणातील उदय सामंत तसंच दादा भुसे हे मंत्री शिंदे यांच्या गटाकडे आहेत. भुसे हे नाशिकचे असले तरी त्यांच्याकडे पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांना ही संधी पुन्हा मिळणार का? याकडे लक्ष आहे.


