वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कोलगेकर
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल वेंगुर्ला येथे १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर यांनी विद्यार्थ्यांना कृषीदिनाचे महत्त्व सांगून शाळेच्या परिसरात फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक मिताली होडावडेकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


