वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कोलगेकर
ग्रामीण कृषी उद्योजकता व कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत कृषी कन्यांकडून प्राथमिक शाळा लोरे नं.१ येथे कृषी दिन साजर करण्यात आला.
यावेळी कृषीदिडी, वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, कृषिविषयक माहिती, विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच अजय रावराणे, ग्रामसेवक ऋतुराज कदम, माजी सरपंच अनंत रावराणे, मुख्याध्यापक माने, कृषी कन्या तनया सावंत, ईश्वरी भोगटे, पूजा गवंडळकर, तन्वी देसाई, तन्वी राणे, रुदाली मासये, धनश्री ढवण यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.


