मुबंई- एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकत विधानसभेत बहुमत सिद्ध केले. शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने १६४ सदस्यांनी मतदान केले. महाविकास आघाडीच्या बाजूने ९९ जणांनी मतदान केले. शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक जिंकला. यामुळे गेली १३ दिवसांहून अधिक काळ चालेल्या सत्तासंघर्षाला आता विराम मिळाला आहे.


