प्रतिनिधी -अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ- कुडाळतील शिवसेनेच्या महीला नगरसेविकेच्या पतीला माड्याचीवाडी येथे जुगार खेळताना निवती पोलिसांनी रंगे हात पकडले त्या नंतर 41 ( 1 ) ची नोटीस देऊन सोडून देण्यात आले. निवती पोलिसांकडून मिळालेल्याअधिकृत माहिती नुसार निवती पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हटकर यांच्या सोबत पोलीस कर्मचारी यांनी माड्याची वाडी येथे जुगाराच्या तीन पत्तीवर धाड टाकली असता १२ संशयिता सह एकूण ६लाख ६४५ रुपये एवढी रक्कम जप्त करण्यात आली . तसेच जे १२ संशयित समोर आले त्यांना ४१( १ ) नोटीस देऊन सोडून देण्यात आले असल्याची, माहिती निवती पोलिसांकडून प्राप्त झालीआहे.
–


