सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सोमवारी मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इशारा पातळी ओलांडली आहे .
भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार ४ जुलै २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


