खंडोबाच्या जेजुरीत पेशवाई बुद्धिबळ स्पर्धा संपन्न, राज्यातील विविध जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी   

0
29

हरिश्चंद्र जेजुरीकर

जेजुरी —  सर्वथरातील नागरिकांच्या बुद्धिकौशल्याला चालना देण्याकरिता जेजुरी शहरातील  समाजसेवक खंडोबा देवाचे ऐतिहासिक मानकरी पेशवे सरदार घराण्याचे वंशज सचिन श्यामकांत पेशवे यांच्या वाढदिवसा निमित्त जेजुरी येथील जयमल्हार चेस अकादमी यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जेजुरी च्या जय मल्हार सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धेत पुणे सोलापूर सातारा सांगली मुंबई ठाणे कोल्हापूर आदी राज्यतील अनेक जिल्ह्यातून स्पर्धक आले होते

या प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक पत्रकार नितीन राऊत, गणेश प्रतिष्ठान अध्यक्ष विठ्ठल  सोनवणे, नगरसेवक अजिंक्य देशमुख सामाजिक  जय मल्हार अकादमी संचालिका सारिका साबळे, सुप्रिया पेशवे कार्यकर्ते गणेश भोसले,नितीन पुरोहित, भारत शेरे  धर्यशील शिंदे शेरे पाटील,प्रसाद वासकर सुशील राऊत, हेमंत चव्हाण, पंकज घोणे संदीप होले आदी मान्यवर उपस्तिथ होते जेजुरीच्या सांस्कृतिक ,ऐतिहासिक विकास बरोबर येथील आणि सर्व थरातील अनेक विद्यार्थी वर्ग यांच्या बुद्धिकौशल्याला चालना देण्या करीता  राजकीय उद्योगजक क्षेत्रातील मान्यवरांनी आशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत असे मत यावेळी सचिन पेशवे यांनी व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here