प्रतिनिधी- सुरेश कोलगेकर
वेंगुर्ला– वेंगुर्ला तालुक्यातील वैश्य समाजातील हुशार व विविध परिक्षांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचा कार्यक्रम १७ जुलै रोजी सायं. ५ वा. साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ नार्वेकर (म्हापण), सामाजिक कार्यकर्ते अनिल निखार्गे (शिरोडा) आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


