प्रतिनिधी- सुरेश कोलगेकर
वेंगुर्ला नशाबंदी मंडळ महाराष्ट्रच्या झालेल्या बैठकीत वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी डॉ.संजिव लिगवत तर सचिवपदी सत्यवान साटेलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत जयराम वायंगणकर, अॅड.मनिष सातार्डेकर, अभि वेंगुर्लेकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, रुपाली पाटील, दाजी नाईक (उपाध्यक्ष), प्रताप गावसकर (खजिनदार), गोपाळ जुवलेकर (सहखजिनदार), श्रीनिवास गावडे (कार्याध्यक्ष), तर ईर्शाद शेख, सचिन परुळेकर, चितामधी धुरी, प्रज्ञा परब, सुचित वजराटकर, प्रदिप सावंत, वामन कांबळी, मकरंद परब, प्रा.संजय पाटील, प्रा.आनंद बांदेकर, वृंदा मोर्डेकर, शिवराम आरोलकर, चित्रा कनयाळकर यांचा सदस्यपदी समावेश आहे. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्रचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, संजय चौहान यांच्यासह नुतन कार्यकारिणी उपस्थित होते.
महाराष्ट्र नशाबंदी मंडळ अंतर्गत १३ जुलै रोजी वेंगुर्ला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज येथे व्यसनमुक्ती अंतर्गत समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला असून जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
फोटोओळी – नंदन वेंगुर्लेकर यांनी नशाबंदी मंडळ महाराष्ट्रच्या वेंगुर्ला कार्यकारिणीचे अभिनंदन केले.


