प्रतिनिधी– सुरेश कोलगेकर
वेंगुर्ला – माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जनशिक्षण संस्थेमार्फत ज्ञानदा विकास संस्थेचे अध्यक्ष संदिप पाटील यांच्या हस्ते दाभोली गावात दहा शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.
यावेळी ज्ञानदा विकास संस्थेचे उपाध्यक्ष गणपत राऊळ, ग्रामपंचायत सदस्य वैभवी आरोलकर, गार्गी राऊळ, विष्णू दाभोलकर, भाजपाचे बुथ अध्यक्ष बंड्या कांबळी, देवेंद्र राऊळ, नंदकिशोर राजापूरकर यांच्यासह शिलाई मशिनचा लाभ मिळालेल्या आरोही राजापूरकर, स्वाती राजापूरकर, वैभवी आरोलकर, स्वरा शेगले, दिव्या जाधव, काजल कांदळकर, सुवर्णा किनळेकर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – जनशिक्षण संस्थेमार्फत उपलब्ध झालेल्या शिलाई मशिनचे महिलांना वाटप करण्यात आले.


