रत्नागिरी- आजही मी शिवसेनेतच आहे. मला भेटणा-या प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिका-याला हेच मी सांगत आहे. त्याहूनही सर्वांना माझे एकच सांगणे आहे काेणीही विचलित हाेऊ नका. आगामी काळाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील गैरसमज दूर हाेईल असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केले.
शिंदे गटात गेल्यानंतर आमदार उदय सामंत पहिल्यांदाच रत्नागिरी मतदारसंघात दाखल झाले. पाली येथील निवासस्थानी सामंत यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली हाेती.
उदय सामंत म्हणाले मी अजून शिवसैनिकच आहे. माझ्या कार्यालयात आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धवजी तसेच आदित्य यांचा फाेटाे आहे. मी कुणाचाही फोटो काढलेला नाही. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावाला काहीतरी कारण आहे असेही सामंत यांनी नमूद केले.
आजपर्यंत मी कुणावरही टीका केला नाही आणि करणार देखील नाही. अडीच वर्षे रखडलेल्या मेडिकल कॉलेजच्या कामाला गती मिळाली आहे असे सांगत सामंत म्हणाले गेल्या अडीच वर्षात घटक पक्षाने किती वाव दिला हे महत्वाचे आहे. त्यांनी शिवसेना संपविण्याचा घाट घातला हाेता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आणि आपल्या मतदारसंघासासाठी काही कमी केलं नाही असेही सामंत यांनी नमूद केले. मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मी मोहिमेत सहभागी झालो याचा मला अभिमान असल्याचे उदय सामंत यांनी सांगत शिवसेनेला डाग लागेल, ती संपेल असं आम्ही काही करणार नाही असं स्पष्ट केले.


