आता संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं, उपोषणं करण्यावर बंदी, धार्मिक कृती करण्यासही मनाई

0
41
संसद अधिवेशनाच्या तारखांवर प्रश्नचिन्ह; “दुष्ट हेतूचा डाव” – पी. चिदंबरम यांचा आरोप
संसद अधिवेशनाच्या तारखांवर प्रश्नचिन्ह; “दुष्ट हेतूचा डाव” – पी. चिदंबरम यांचा आरोप

मुबंई- संसदेचं पावसाळी 18 जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घातल्यानंतर आता आणखी एक नवा आदेश लोकसभा सचिवालयानं खासदारांना दिला आहे. संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच संसद परिसरात कोणतीही धार्मिक कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या आधी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसाठी असंसदीय शब्दांची यादी जाहीर करण्यात आली होती. या असंसदीय शब्दांना लोकसभा आणि राज्यसभेत वापरणं असंसदीय मानलं जाणार आहे. लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द 2021 या शीर्षकासह ही यादी प्रकाशित करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here