प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
असगाेली– गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडीतील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी नेताना नदीतील ढोपरभर पाण्यातून प्रवास करून न्यावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. या नदीवर पूल बांधण्याची मागणी करूनही आजवर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने माणसाच्या मरणानंतरही त्याचा प्रवास खडतरच असल्याचे दिसत आहे.
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच, आजही ग्रामीण भागात अनेक महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. या सोयी-सुविधांकडे शासन व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना आता मरणानंतरही हाल भोगावे लागत आहेत.


