वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कौलगेकर
वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेतर्फे देण्यात येणारा व्यासंगी वाचक पुरस्कार यावर्षी प्रा.अरविद विश्राम सावंत यांना जाहीर झाला असून १७ जुलै रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
नगर वाचनालय संस्थेकड कै.श्रीराम मंत्री यांनी सुदत्त कल्याण निधीतर्फे देणगी दिलेली आहे. या देणगीतून स्व.सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. नगर वाचनालय संस्थेचा जो सभासद विविध वाङ्मयीन वाचन नियमित करतो अशा सभासदाला हा पुरस्कार देण्यात येतो. प्रा.अरविद विश्राम सावंत हे कुडाळ हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांचे शिक्षण एम.कॉम.बी.एड. असून त्यांनी डी.एच.ई. ही पदवी प्राप्त केली आहे. ते कुडाळ हायस्कूलमध्ये पुस्तकपालन व लेखाकर्म हा विषय शिकवित होते. तसेच ते योगसाधकही आहेत. नगरवाचनालय संस्थेचे ते निमित वाङ्मयीन वाचक असल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १७ जुलै रोजी सकाळी ११ वा. कॅनरा बँकेचे वेंगुर्ला शाखाधिकारी धनराज आंबेटकर यांच्या हस्ते वेंगुर्ला नगरवाचनालय येथे होणार आहे.