महाराष्ट्राच्या दुसऱ्या विजयात अस्लम इनामदार चमकला.

0
48
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

शशिकांत राऊत

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने आज ‘ड’ गटात गुजरातचा ५४-२२ असा पराभव करीत “६९व्या राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या साखळी विजयाची नोंद केली. हरियाणा राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने चरखी, दादरी – हरियाणा येथील या विजयाने महाराष्ट्राने आपले बाद फेरीतील स्थान निश्र्चित केले. आक्रमक सुरवात करीत पूर्वार्धातच दोन लोण देत महाराष्ट्राने २८-१३ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात खेळ थोडा धीमा करीत आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अस्लम इनामदार, आकाश शिंदे यांच्या झंजावाती चढाया त्याला मयूर कदम, देवेंद्र कदम यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हा विजय सोपा गेला. उद्या सकाळच्या सत्रात तामिळनाडू बरोबर महाराष्ट्राचा शेवटचा साखळी सामना होईल. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात बाद फेरीचे सामने खेळविण्यात येतील.

 साखळीतील इतर निकाल :- १) केरळ वि. वि. झारखंड -(५७-३८), व हिमाचल प्रदेश वि वि झारखंड (६४-२९) दोन्ही इ गट; ३)तामिळनाडू वि वि गुजरात (५०-२७)- ड गट; ४)कर्नाटक वि वि बि एस एन एल (४३-०५)- फ गट;  ५)छत्तीसगढ वि वि तेलंगणा (५४-४८) – ग गट; ६)पंजाब वि वि उत्तराखंड (४३-३१) – ह गट, ७)बिहार वि वि ओरिसा (५१-२५) – क गट; ८)सेनादल वि वि पॉंडेचारी (५४-२०) – ब गट;  ९)राजस्थान वि वि मणिपूर (५९-१८)- क गट.

  छायाचित्र :- दिनेश घाडीगांवकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here