सिंधुदुर्ग: जीएसटीमुळे पीठ, डाळ, तांदूळ किती महागले? सर्वसामान्य जनतेचा कणाच मोडून पडला

0
22
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

पैशासाठी जुगार मटक्याची सर्वसाधारण माणूस चालतोय पायवाट

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर –

केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावल्यानंतर अन्नपदार्थांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. रोज लागणारे पीठ, डाळ, तांदूळ आणि साखर यांच्या किमतींत वाढ पाहायला मिळाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा खिसा दिवसेंदिवस रिकामा होत आहे.

व्यापारी म्हणाले की, सामान्यत: सध्या सुरू असलेल्या पावसामुळे डाळ, साखर, तांदूळ यांच्या किमतींत वाढ होते. मात्र आता जीएसटी लावल्याने आणि त्यानंतर मूळ किमतीत वाढ केल्याने वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. १८ जुलैनंतर जीएसटीचा बोझा वाढल्यानंतर दुग्ध उत्पादनांच्या किमतींत वाढ झाली आहे. पिठाच्या किमतीत जीएसटी वगळून प्रति किलो दोन रुपयांची वाढ झाली आहे. याचवेळी तांदूळ पाच ते १५ रुपयांनी महागले असून, डाळींच्या किमतीत २० रुपयांनी वाढ झाली आहे. याच कारणांमुळे सामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होण्यास सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here