महत्वाचे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 29 जुलै ते ऑगस्ट 12 पर्यंत मनाई आदेश लागू – जिल्हाधिकारी

0
51
.जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी

ओरोस:सिंधुदुर्ग जिल्ह्यात 29 जुलै ते ऑगस्ट 12 पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केला असल्याची सूचना जरी करण्यात आली आहे. दिनांक 31 जुलै 2022 ते 9 ऑगस्ट 2022 रोजी मोहरम उत्सव, दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी नागपंचमी दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधन, नारळी पोर्णिमा सण पारंपारिक पद्धतीने साजरे होणार आहेत. तसेच कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शालांत्न प्रमाणपत्र परीक्षा -2022 (12 वी) दि. 21 जुलै 2022 ते 12 ऑगस्ट 2022, माध्यमिक शालांत्न परीक्षा प्रमाणपत्र परीक्षा 2022 (10 वी) दि. 27 जुलै 2022 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत होत आहेत.

राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्धी गट आपापल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन एकमेकांना लक्ष करत असून त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून अचानकपणे मोर्चा, वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, निदर्शने, रास्ता रोको वैगरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 37 (3) नुसार दिनांक 29 जुलै 2022 रोजी रात्री 12 वाजलेपासून ते दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 24 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यांस मनाई आहे.

कलम 37 (1) Ø शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. Ø अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. Ø दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे. Ø व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.) Ø सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे. Ø सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

कलम 37(3) Ø सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे. Ø हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .

वरील कालावधीतील मिरवणूकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here