सिधुदुर्ग: तेली समाजातील विद्यार्थ्यांचा ७ रोजी गुणगौरव

0
20
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

वेंगुर्ला : सिधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ शाखा वेंगुर्ला तर्फे तालुक्यातील मागील २ वर्षातील आणि चालु वर्षातील दहावी, बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ७ ऑगस्ट रोजी तुळस सरकारी रुग्णालयाजवळील शशिकांत तेली यांच्या निवासस्थानी सायं.४ वा. आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा जास्त गुण आहेत  अशांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत क्वॉलिटी कोल्ड्रिक्स, दाभोली नाका येथे किवा नम्रता बिपिन वरसकर यांच्याकडे प्रत्यक्ष किवा वरसकर यांच्या ९४०४७८७४९० या व्हॉटसअॅपवर ५ ऑगस्टपर्यंत पाठवावेत. या कार्यक्रमाला तेली समाजातील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी तसेच समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष आपा तोटकेकर व सचिव विद्याधर वरसकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here