वेंगुर्ला प्रतिनिधी
नागपंचमी उत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असतानाच गणपती शाळांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागांच्या मूर्तीवर मूर्तिकार अंतिम रंगाचा हात मारताना सर्वच गणेश मूर्ती शाळेत चित्र दिसत आह
तळ कोकणात मोठ्या प्रमाणात गौरी गणपतीचा सण उत्सव जसा साजरा केला जातो मात्र या सणाची जी चाहूल असते ती नागपंचमीपासूनच सुरू होते नागपंचमीच्या दिवशी नाग मूर्तीची पूजा करून त्याला सुवासिक फुले दूध लाया लाह्या याचा नैवेद्य देऊन आमचे रक्षण कर आमच्या शेताचे रक्षण कर असा आशीर्वाद घेतला जातो मात्र या सणापासूनच अवघ्या एक महिन्यावर नागपंचमी नंतर गणेशाचे आगमन होते. सर्व गणेश मूर्ती बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये गणपतीची मूर्ती बनविण्याचा जशी लगबग असते तशीच लगबग नागाच्या मूर्ती बनविण्यात असते गणेश मूर्ती बनविण्याच्या कारखान्यामध्ये गणेश मूर्ती बनविण्या चे प्रशिक्षण घ्यावयाचे असेल तर पहिल्यांदा त्या नवीन मूर्तिकारस नागाची मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते यामध्ये त्याचे कौशल्य बघितल्यानंतर हळूहळू त्याला गणेश मूर्ती कामातील बारकावे शिकून नंतर मूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते
यावर्षी मातीची किंमत व रंगाची किंमत वाढल्याने यावर्षी नागोबा मूर्ती शंभर रुपयापासून सुरू होऊन अडीच हजार रुपयापर्यंतही मूर्तीची किंमत असते साधारणता एक फुटापासून नागोबाची मूर्ती बनविले जाते मात्र काही हौशी नागदेवता भक्त अतिशय उंच नागोबाची मूर्ती बनवितात त्याला वारूळ व इतर मातीचे काम करून नागाची मूर्ती बसविली जाते काही जण घरी कापसाची नागदेवता तर काहीजण पिठापासूनही नागदेवता बनवून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आजही आहे मात्र गणेश मूर्ती शाळेत नागोबाच्या मूर्तीवर अंतिम रंगाचा हात फिरवताना मूर्तिकार मग्न झालेले दिसत आहेत त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात नागोबाच्या मूर्ती आलेल्या चे चित्र बाजारपेठेत दिसत आहे


