आसाराम बापूला बुधवारी रात्री ताप आल्याने कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली.त्यांनतर आणि ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्यामुळे महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आसाराम बापूला त्याच्या आश्रमात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण करण्याच्या आरोपाखाली २०१८ पासून आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे. १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली जयपूर कोर्टाने दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.