वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी जे.एम.गाडेकर व अनिल सौदागर यांनी दिलेल्या देणगीतून आदर्श शिक्षक / शिक्षिका व गं.भा.गंगाबाई पांडुरंग जोशी स्मरणार्थ आदर्श शाळा पुरस्कार सन २०२१-२२ देण्यात येणार आहेत. यासाठी संपूर्ण माहिती भरलेले अर्ज २० ऑगस्टपर्यंत ग्रंथपाल, नगरवाचनालय, वेंगुर्ला यांच्याकडे ग्रंथालयाच्या कामकाजाच्या वेळेत आणून द्यावेत.
आदर्श शिक्षक, शिक्षिका आणि आदर्श शाळेच्या अर्जाचा नमुना वाचनालयात उपलब्ध आहे. त्यासाठी आवश्यक तर स्वतंत्र कागदावर रितसर माहिती भरुन शाळेच्या मुख्याध्यापकांच्या शिफारशीसह इच्छुकांनी अर्ज पाठवावेत असे आवाहन नगरवाचनायलाच्या कार्यवाह यांनी केले आहे.
दिप्ती कोचरेकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
वेंगुर्ला प्रतिनिधी- ज्ञानज्योती सामाजिक सेवाभावी संस्था, सोलापूर या संस्थेचा राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार २०२२ अंतर्गत वायंगणी कोचरेकरवाडीच्या सेवाभावी काम करणा-या शिक्षिका दिप्ती दिपक कोचेरकर यांना आदर्श शिक्षिका प्रेरणा गौरव पुरस्कार कोल्हापूर येथील ताराबाई पार्क जवळील सभागृहात ३१ जुलै रोजी प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी कराड महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. उज्वला पाटील, प्रमुख पाहुणे भारत सरकारच्या महा मेट्रो रेल्वेचे ब्रँड अॅम्बेसिडर व महाराष्ट्र राज्य इंडस्ट्रीज असोसिएशन पुणेचे अध्यक्ष अभयदादा सोपानराव भोर, डॉ.सुरेश कु-हाडे, डॉ.विक्रम शिंगाडे, डॉ.चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.
फोटोओळी – वायंगणी येथील दिप्ती कोचरेकर यांना आदर्श शिक्षिका प्रेरणा गौरव पुरस्काराने कोल्हापूर येथे गौरविण्यात आले.


