सिंधुदुर्ग : कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करा-नाडकर्णी

0
31
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कौलगेकर

भारत आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करणार आहे. आपण सगळेच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. पंतपधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी साथ देत ९ ते १७ ऑगस्ट या दरम्यान स्वराज्य महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करुया असे आवाहन भाजपा ‘हर घर तिरंगा‘ अभियानाचे जिल्हा संयोजक एकनाथ नाडकर्णी यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले .

वेंगुर्ला भाजपा कार्यकर्त्यांची बैठक तालुका कार्यालयात पार पडली.  यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव २०२२‘ व ‘हर घर तिरंगा‘ या अभियानाची माहिती दिली. तसेच तालुक्यातील ९३ बुथवर भाजपाचे बुथप्रमुख व बुथ कमिटीतील कार्यकर्ते प्रत्येक बुथमधील कुटुंबाला तिरंगा मिळाला की नाही याची खातरजमा करून तो झेंडा कशाप्रकारे लावावा याबाबत माहिती देतील. याबरोबरच तालुक्यात तिरंगा मोटरसायकल रॅली, स्वच्छता अभियान, महिला बचत गटांना मार्गदर्शन, तिरंगा सायकल रॅली, शेतक-यांना मार्गदर्शन, तिरंगा दौड, वृक्षारोपण, मशाल फेरी, प्रभात फेरी, देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली.

यावेळी भाजपाचे सुहास गवंडळकर, दिलीप गिरप, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, सोमनाथ टोमके, साईप्रसाद नाईक, बाळा सावंत, बाबली वायंगणकर, प्रितेश राऊळ, मनवेल फर्नांडीस, लक्ष्मीकांत कर्पे, संदिप पाटील, तुषार साळगांवकर, भुषण सारंग, शितल आंगचेकर, प्रशांत आपटे, जयंत मोंडकर, प्रकाश रेगे, अॅड.जी.जी.टांककर, प्रार्थना हळदणकर, वृंदा गवंडळकर, वृंद मोर्डेकर, आकांक्षा परब, सारिका काळसेकर, महादेव नाईक, जगन्नाथ राणे, संतोष शेटकर, नितीन चव्हाण, कमलेश गावडे, सुधीर गावडे, विजय बागकर, विद्याधर धानजी, सुनिल चव्हाण, रुपेश राणे, निलेश मांजरेकर, शंकर घारे, ज्ञानेश्वर केळजी, संदिप धानजी, सुनिल घाग, सुभाष खानोलकर, शेखर काणेकर, नारायण गावडे, पुंडलिक हळदणकर, वसंत परब आदी उपस्थित होते.

फोटोओळी – वेंगुर्ला येथील बैठकीत ‘हर घर तिरंगा‘ अभियानाचे जिल्हा संयोजक एकनाथ नाडकर्णी यांनी उपस्थितांना ‘स्वराज्य महोत्सव २०२२‘ व ‘हर घर तिरंगा‘ बाबत मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here