वेंगुर्ला प्रतिनिधी-सुरेश कौलगेकर
शेतक-यांनी स्वतः मोबाईल अॅपद्वारे २.०० या व्हर्जनमध्ये ई-पीक पाहणी व नोंदणी वेळीच करावी. त्यामुळे पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती व अन्य योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन तहसिलदार प्रविण लोकरे यांनी आडेली-देऊळवाडी येथे केले.
वेंगुर्ला तहसिल कार्यालय महसूल विभाग अंतर्गत आडेली येथे तहसिलदार प्रविण लोकरे यांनी क्षेत्रभेट घेत ई पीक पाहणी, मोबाईल अॅप पीक पाहणी नोंद याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ अधिकारी के.एल.निग्रे, तलाठी चारुशिला वेतोरकर, नाना धर्णे, दादा धर्णे, सिताराम धर्णे, सुरेश धर्णे, जगन्नाथ आरोलकर, सोनू घाडी, प्रकाश घाडी, रवि धर्णे, सखाराम आडेलकर, विष्णू आडेलकर, पोलिस पाटील संजना होडावडेकर, कोतवाल राजन दाभोलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोओळी – आडेली -देऊळवाडी येथे ई पीक पाहणी नोंदणीबाबत तहसिलदार प्रविण लोकरे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले.


