प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग- निरोगी आरोग्याच्या जनजागृतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील सायकलपटू सायकलवरून कन्याकुमारीला निघाले आहेत. हे सायकलपटू 1320 किलोमीरचा प्रवास करणार आहेत. रूपेश तेली, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर हे तीन तरुण कुडाळ ते कन्याकुमारी असा सायकलने प्रवास करणार आहेत. यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग या संस्थांनी पुढाकार घेत कुडाळ ते कन्याकुमारी सायकलिंग करण्याचे नियोजन केले आहे.


