मुबंई- मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज आला आहे 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. भारताबाहेरील क्रमांकावरून मेसेज आल्याची माहिती मिळत आहे. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज आला. मेसेज करणाऱ्यानं म्हटलंय की, जर त्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचं दाखवलं जाईल आणि धमाका मुंबईत होईल. धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलंय की, भारतात सध्या 6 लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यासोबतच दुसऱ्या तपास यंत्रणांनाही याची माहिती दिली आहे.


