सिंधुदुर्ग- मंत्रिपदाची शपथ घेताच दोडामार्ग कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष

0
26
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

प्रतिनिधी- दोडामार्ग / सुमित दळवी


भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोडामार्ग शहराच्या गांधी चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत चव्हाण साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, “कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला” अशा घोषणा देत दोडामार्ग मधील समर्थकांनी मोठया उत्साहात जल्लोष केला.यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवुन आनंद व्यक्त केला.


यावेळी कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण बांधकाम सभापती नितीन मणेरीकर,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, सुधीर पनवेलकर, दादा पालयेकर, संतोष म्हावलंकर, रंगनाथ गवस,पिकी कवठणकर,मिलिंद नाईक,तर केसरकर गटातून गोपाळ गवस,तिलकाचंन गवस,संदीप गवस आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार केसरकर यांचे तालुक्यात जंगी स्वागत करू असे सांगत आमचे दिपकभाई पुन्हा एकदा जिल्ह्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेतील आणि आपल्या मंत्रिपदाला योग्य तो न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here