सिंधुदुर्ग- राष्ट्रवादीच्या बावतीस फर्नांडिस यांचे आश्वासनाअंती ऊपोषण तूर्तास स्थगीत

0
16

प्रतिनिधी- संजय भाईप (सावंतवाडी)

सावंतवाडी तालुक्यातील कोलगांव इथं शासनाचे कोट्यावधी रुपये खर्चून शासकीय गोदाम बांधण्यात आले आहे. परंतु या शासकीय इमारतीचे बरेचसे काम अपूर्ण असून देखील त्याचे संबंधीत ठेकेदाराला एक करोड आठ लाख पाच हजार रुपये अदा करण्यात आले. या इमारतीचे काम हे पुर्णपणे चुकीच्या पद्धतीने झाले असून ते अपुर्ण अवस्थेत आहे. धान्य गोदामाला धान्य लोड व अनलोडींग करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने रॅम्प असल्यामुळे तेथे धान्याची गाडी लावणे शक्य नाही.

गोदामापर्यंतचा रस्ता अरुंद असून रस्त्यावरील पुल हे लहान असल्यामुळे या पुलावरून अवजड वहाने चालविणे धोकादायक आहे. संबंधीत जागा ही शासकिय गोदामासाठी योग्य नसताना देखील संबंधीत जागा सुचविणाऱ्या अधिकारी व संबंधीत कर्मचाऱ्यांवर चौकशी करुन तहसिलदार कार्यालयाची दिशाभूल करून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केल्याबद्दल त्वरीत फौजदारी गुन्हा दाखल करुन संबंधीताकडून झालेला खर्च वसूल करून योग्य ठिकाणी शासकीय धान्य गोदामाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करत संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बावतीस फर्नांडिस यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनी सावंतवाडी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडल होते.

माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पाठिंबा दिला. यावेळी संबंधितांवर तातडीनं करवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. यानंतर प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी उपोषण कर्त्यांची उप अभियंता आवटी सोबत उप़ोक्षण कर्त्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता यांना त्वरीत कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले. यानंतर हे उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here