देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखणे आता विद्यार्थ्यांच्या हाती : मुख्याध्यापक श्री. दशरथ घाडी

0
13
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

प्रतिनिधी- संजय भाईप (सावंतवाडी)

इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हजारो देशवासीयांनी बलिदान दिले व स्वातंत्र्य मिळवलं, ते भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखणे आता तरुण विद्यार्थ्यांच्या हाती आहे. ” असे उदगार मुख्याध्यापक श्री दशरथ घाडी* यांनी व्यक्त केले. ते स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. न्यू इंग्लिश स्कूल मडुरा ता. सावंतवाडी या प्रशालेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी निवृत्त माजी सैनिक कॅप्टन शंकर भाईप (कास), माजी विद्यार्थी मा. श्री. अर्जुन परब उपस्थित होते. याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मुख्याध्यापक श्री. दशरथ घाडी यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रगीत नंतर देशभक्तीपर गीत गाण्यात आले.
“सेनादलामध्ये नोकरी म्हणून नाही तर देशसेवा म्हणून जाणे आवश्यक आहे, तरुणांना ही एक संधी आहे. ” असे मार्गदर्शन कॅप्टन श्री शंकर भाईप यांनी विद्यार्थ्यांना केले.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. देशभक्त नेत्यांचे वेशभूषा करून विद्यार्थी प्रशालेमध्ये उपस्थित होते. माझी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सौ. सुवर्णा मडुरकर, व अन्य पालक देखील याप्रसंगी उपस्थित होते. सर्व पालकांचे मुख्याध्यापक श्री दशरथ घाडी यांनी स्वागत केले. कॅप्टन शंकर भाईप यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ दिला. तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा सर्व विद्यार्थी व पालकांना गोड खाऊ दिला.
शारीरिक अपंगावर मात करून शाळेमध्ये नेहमी कार्यरत असणारे व प्रामाणिक सेवा देणारे श्री. एकनाथ राऊळ यांचा प्रशालेच्यावतीने माजी सैनिक कॅप्टन शंकर भाईप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सेवक श्री. नागेश जी सावंत यांचाही गौरव करण्यात आला.
सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी हायस्कूल ते मडुरा तीठा येथे प्रभात फेरी काढली. यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य मधून देशभक्ती संदर्भात संदेश दिला. पथनाट्य व प्रभात फेरीचे ग्रामस्थांच्या कडून कौतुक करण्यात आले. श्री. विलास सातार्डेकर यांनी गोड खाऊ दिला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. सावंत जे.डी. मॅडम व क्रीडा शिक्षक श्री महेश नाईक सर यांचे मुख्याध्यापक श्री दशरथ घाडी सर यांनी विशेष कौतुक केले. या सर्व सोहळ्याप्रसंगी रोनापाल गावच्या पोलीस पाटील सौ. निर्जरा परब मॅडम उपस्थित होत्या.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव न्यू इंग्लिश स्कूल मडुरा या प्रशालेमध्ये अत्यंत उत्साह मध्ये साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here